घरदेश-विदेशबिपीन रावत, कल्याण सिंह , प्रभा अत्रे ,राधेश्याम खेमका यांना पद्मविभूषण

बिपीन रावत, कल्याण सिंह , प्रभा अत्रे ,राधेश्याम खेमका यांना पद्मविभूषण

Subscribe

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा

केंद्र सरकारने २०२२ या वर्षासाठीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहेे. यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे, देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह आणि गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उंचावणार्‍या व्यक्तींना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाही या पुरस्काराची यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.तसेच पदम्भूषण पुरस्कारामध्ये सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांचा समावेश आहे.

पद्मविभूषण पुरस्कार –
प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका (मरणोत्तर)

- Advertisement -

पद्मभूषण पुरस्कार –
सायरस पुनावाला (व्यापार आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद

पद्मश्री पुरस्कार –
बालाजी तांबे (मरणोत्तर), विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया

- Advertisement -

नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदक

टोकियो ऑलम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नीरज चोप्राला सन्मानित करण्यात आले. नीरज भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहे.

महाराष्ट्रातील ५१ पोलिसांचा गौरव

प्रजासत्ताक दिनी ७ जणांना शौर्य; तर चौघांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. त्यानुसार शौर्य गाजवणार्‍या एकूण 939 पोलिसांना मंगळवारी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय महादेवराव करगावकर, कमांडंट प्रल्हाद निवृत्ती खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे आणि पोलीस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका’ने गौरविण्यात येणार आहे. तर 7 ‘पोलीस शौर्य पदक’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता 40 पोलीस पदक देखील महाराष्ट्रातील पोलिसांना जाहीर करण्यात आली आहेत.

देशातील १८९ पोलिसांना पोलीस शौर्य पदके देण्यात येणार आहेत. १८९ शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक १३४ पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल आहेत. दहशतवाद प्रभावित भागातील ४७ पोलीस आणि ईशान्य प्रदेशात १ पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये ११५ जवान जम्मू-काश्मीर पोलीस, ३० सीआरपीएफ, ३ आयटीबीपी, २ बीएसएफ, ३ एसएसबी, १० छत्तीसगड पोलीस, ९ ओडिसा पोलीस आणि ७ महाराष्ट्र पोलीस आणि उर्वरित राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील आहेत. तसेच ४२ जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यापैकी १ जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि २ जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस शौर्य पदक विजेत्यांची नावे

-गोपाल मणिराम उसेंडी, एपीएस आयपीएमजी
-महेंद्र गानू कुलेती, एनपीसी पीएमजी
-संजय गणपती बकमवार, पीसी पीएमजी
-भरत चिंतामण नागरे, पीएसआय पीएमजी
-दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी पीएमजी
-निलेश्वर देवाजी पाडा, एनपीसी पीएमजी
-संतोष विजय पोटावी, पीसी पीएमजी

राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणारे अधिकारी

-विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक, मुंबई,
-प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट, एस.आर.पी.एफ.जीआर.व्हीआय, धुळे,
-चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक, पी.टी.सी. दौंड, पुणे
-अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक. नांदेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -