पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; ‘हे’ ठरले यंदाचे मानकरी

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचे पुरस्काराचे हे 24 वे वर्ष आहे.

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचे पुरस्काराचे हे 24 वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षातला पुरस्कार सोहळा हा 20 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. (padmashri daya pawar smriti award announced)

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, ‘भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रत्येकी 10 हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘स्टँन्ड अप कॉमेडी’ कलाप्रकारात एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या बीडच्या अंकुर तांगडे आणि नागपूरच्या नेहा ठोंबरे यांचा ‘ब्लु मटेरियल-दलितों का शो(षण)’ हा स्टॅन्ड अप कॉमेडीचा प्रयोगही होणार आहे.

‘पद्मश्री दया पवार या पुरस्काराने आतापर्यंत अनेकांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानुसार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे यांसह अनेकांना सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा – राज्यात पुढील पाच दिवस ‘मुसळधार’च; 12 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार