घरताज्या घडामोडीपाकिस्तानने निगराणी सूचीमधून ४ हजार दहशतवाद्यांची नावे हटविली!

पाकिस्तानने निगराणी सूचीमधून ४ हजार दहशतवाद्यांची नावे हटविली!

Subscribe

पाकिस्तानने आपल्या निगराणी सूचीमधून जवळपास ४ हजार दहशतवाद्यांची नावे हटवली आहे. यामध्ये जकी- उर- रहमान या दहशतवाद्यांचे नाव आहे.

आम्ही दहशतवादापासून पीडित आहोत, असे सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) स्टार्टअपने खुलासा केला आहे की, पाकिस्तानने आपल्या निगराणी सूचीमधून जवळपास ४ हजार दहशतवाद्यांची नावे हटवली आहे. यामध्ये जकी- उर- रहमान या दहशतवाद्यांचे नाव आहे. लष्कर-ए-तोयबा संघटनेचा कमांडर जकी -उर -रहमान हा २६/११ मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. भारत आणि जगभरात दहशतवादला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला फायन्शियल फंडिंग टास्क फोर्सने गेल्यावर्षी जून महिन्यात ग्रे सूचीमध्ये टाकले होते. फायन्शियल फंडिंग टास्क फोर्स दहशतवाद फंडिंगवर लक्ष ठेवते.

दहशतवादी फंडिंगवर लगाम लावण्यासाठी पाकिस्तानला फेब्रुवारी २०२० आर्थिक कृती कार्यबल (एफएटीएफ)ने पाकिस्तानला चार महिन्याचा कालावधी दिला होता. पाकिस्तानला त्यांनी २७ प्रतिबंधात्मक सूची दिली होती. एफएटीएफने सांगितले की, जर पाकिस्तानला ग्रे सूचीमधून बाहेर पडायचे असेल तर या २७ प्रतिबंधात्मक सूचीचे पालन केले पाहिजे. एफएटीएफ जून महिन्यात पाकिस्तानचा आढावा घेणार आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्कच्या स्टार्टअप कॅस्टेलमने सांगितल्या प्रमाणे, गेल्या अडीच वर्षांमध्ये पाकिस्तानने ३८०० नाव निगराणी सुचीमधून हटवली आहे. इमरान खान सरकारने ९ मार्चनंतर दहशतवाद निगराणी सूचीमधून जवळपास १८०० नाव हटविली आहे. यात लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जकी-उर-रहमान याचे नाव आहे.

एफएटीएफच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या दहशतवादी निगराणी सुचीमधून ऑक्टोबर २०१८ मध्ये जवळपास ७,६०० नाव होती. कॅस्टेलमने सांगितले की, ९ ते २७ मार्चमध्ये इमरान खान सरकारने निषिद्ध लोकांच्या सूचीतून १०६९ नाव हटविण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तानने २७ मार्चनंतर निगराणी सूचीमधून ८०० हून अधिक नावे हटविली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -