घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजम्मु कश्मीरमध्ये आता पाकिस्तानचा झेंडा फडकत नाही : माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता

जम्मु कश्मीरमध्ये आता पाकिस्तानचा झेंडा फडकत नाही : माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता

Subscribe

लोकशाहीची प्रक्रिया सुरू झाली आहे

नाशिक : जम्मु काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर तेथील परिस्थिती सुधारली आहे. आता काश्मीर खोरयात विकास प्रक्रिया गतीमान झाली असून लवकरच येथे नवीन सरकार येणार आहे. भारत माता कि जय म्हणण्यास गुन्हा मानल्या जाणारया काश्मीर खोरयात आता पाकिस्तानचा झेंडा फडकत नाही शांततेची नवी पहाट उगवते आहे असे प्रतिपादन जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी केले.

जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी सोमवारी नाशिकमध्ये भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मूचा इतिहास मांडला. मागील ७० वर्षात जम्मूने दहशतवाद, परिवारवाद, भ्रष्टाचार दिला. पंडीत नेहरू, शेख अब्ब्दुल्ला यांच्या चुकीमुळे येथे कलम ३७० लावण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी खूप सहन केले. आधीच्या सरकारमध्ये सैन्य दलावर दगडफेक केली जायची, भारत माता की जय म्हणणं तेथे गुन्हा मानला जात होता. परंतू नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आले. भाजप जे बोलते ते करते असे म्हणत राम मंदिराच्या मुददयावरून देखील अगोदरच्या सरकारवर निशाणा साधला. मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बतांऐेंगे अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून केला जात होता मात्र राम मंदिर आणि कलम ३७० हटविण्याचे काम मोदी सरकारने करून दाखवल्याचे ते म्हणाले. जम्मूतील दहशतवाद मोडीत काढण्यासाठी सैन्य दलाला फ्रीहँड देण्यात आला आहे. दहशतवादाला उत्तर देण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी जम्मूमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात होते आज मोदींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर पहील्यांदाच १५ ऑगस्टपर्यंंत घराघरांत तिरंगा फडकणार असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

७० हजार कोटींची गुंतवणुक

दहशतवाद, कलम ३७० मुळे जम्मू काश्मीर विकासापासून वंचित राहीला. परंतू आता ७० हजार कोटींची गुंतवणूक येऊ घातली आहे. दळणवळणासह पायाभुत सुविधांचा विकास होत आहे. रस्ते, रेल्वेचे जाळे विणले जात आहे. आयटी कंपन्यांना दारे खुली करण्यात आली आहे. जी २० देशांची परिषदेतील काही संमेलन येथे होणार आहेत. भारत सरकारच्या सर्व योजनांचा लाभ येथील नागरिकांना मिळत आहे. पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निर्माण झाली आहे. तसेच लवकरच तेथे विधानसभा निवडणुका होणार असून नवीन सरकार येणार आहे. आगामी काळात जम्मू काश्मीर सर्वांसाठी खुले असेल असेही गुप्ता म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -