मुंबई : पाकिस्तानला माहित आहे की, शिवसेना ठाकरेंची माहित आहे. पण निवडणुक आयोगाला माहित नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हा महत्त्वाच्या सुनावणी सुरू आहे आणि हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे असेही संजय राऊतांनी म्हटले. संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलाताना निवडणूक आयोगावर निशाण साधला आहे.
निवडणूक आयोगासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “निवडणूक आयोगाला कळत नाही की, या पक्षाचे मालक आणि नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला देखील माहिती आहे की, शिवसेना ठाकरेंची आहे. पण निवडणूक आयोगाला माहित नाही. यापूर्वीच्या काळी कबील्यांचा ताबा घेऊन लुटमार करणाऱ्या टोळ्या होत्या. पण राजकारणात भाजपने टोळ्या निर्माण केल्या आहेत. ते पक्षांचा ताबा घेतला जायचा आणि घटनात्मक संरक्षण त्यांना दिले जाते. हे दुर्गैव, निवडणूक आयोगाने काहीही निर्णय घेऊ द्यात. पण शिवसेना ही बाळासाहेबांची होती आणि पुढेही राहणार आहे. निवडणूक आयोगाही घटनात्मक संस्था असून पिंचऱ्यातल्या पोपट झाली आहे”, असे म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
हेही वाचा – केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेताना काय घडले? डॉ. भारती पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
संजय राऊत पुढे म्हणाले, “बोगत प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील झाले होते आणि त्यांनी शिवसेनेचे फक्त आमदार पळवले नाही तर पक्षावर ताबा केला. यासाठी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिले होते. पण निवडणूक आयोगाने त्याचा संदर्भ घेतला नाही. यामुळे एकतर्फी निर्णय घेतला. शिवसेने प्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात देखील तोच प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरही निवडणूक आयोगाला प्रश्न पडतो की राष्ट्रवादी कोणाची”, अशी टीका संजय राऊतांनी केली.