घरताज्या घडामोडीPakistani PM's Saudi Visit : PM शहबाज शरीफांविरोधात चोर-चोर घोषणा, मदिनामध्ये पाकिस्तानी...

Pakistani PM’s Saudi Visit : PM शहबाज शरीफांविरोधात चोर-चोर घोषणा, मदिनामध्ये पाकिस्तानी नागरिक संतापले

Subscribe

पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वात पाकिस्तान सरकारचे शिष्टमंडळ तीन दिवसीय सौदी दौऱ्यावर आहे. सौदीत पोहोचल्यावर शरीफ यांचे पाकिस्तानी नागरिकांनी चोर-चोर अशा घोषणा देत आहेत. पंतप्रधान शरीफ सौदी अरेबियातील मदिना येथील मस्जिद-ए-नबावी येथेही पोहोचले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये लोक चोर चोर अशा घोषणा देत आहेत.

पाकिस्तानमध्ये सत्तापालट झाल्यानंतर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले आहेत. इमरान खान यांच्या सरकारनंतर शरीफ यांनी सत्ता स्थापन केली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई वाढल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. याचे पडसाद आता विदेशातही दिसत आहेत. शरीफ यांच्यासह शिष्टमंडळ तीन दिसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत डझनभर अधिकारी आणि राजकीय नेतेमंडळी देखील आहेत. मदिना येथील मस्जिदमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा शरीफ यांच्याविरोधात रोष दिसला. शेकडो नागरिकांनी पंतप्रधान शरीफ आल्यानंतर चोर-चोर अशी घोषणा देत स्वागत केले. घोषणा देणाऱ्या नागरिकांना अटक करण्यात आले आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा पहिलाच अधिकृत दौरा आहे. शरीफ सौदी अरेबियाकडून ३.२ अब्ज डॉलरच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी करणार आहेत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट होऊ नये यासाठी शरीफ सौदी अरेबियाकडे विनंती करणार असल्याचे समजते आहे. ‘मी या पवित्र भूमीवर या व्यक्तीचे नाव घेणार नाही, कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण त्यांनी (इमरान खान) पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे.’मी या पवित्र भूमीवर या व्यक्तीचे नाव घेणार नाही, कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण इमरान खानने पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे. असे म्हणत या घोषणाबाजीला इम्रान खान यांना जबाबदार ठरवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटाचे सत्र सुरूच; दोन बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -