घरमहाराष्ट्रPalghar Accident : पालघरमध्ये एसटी 20 फूट दरीत कोसळली; 15 ते 20...

Palghar Accident : पालघरमध्ये एसटी 20 फूट दरीत कोसळली; 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी

Subscribe

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच जखमींना तात्काळ बस मधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले

पालघरमधील वाघोबा खिंडीच्या परिसरात एसटी बसचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुसावळ ते बोईसर दरम्यान ही एसटी बस 20 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एसटीमधील 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एसटीचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवत होता. यावेळी त्याचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि एसटी थेट 20 फूट खोल दरीत जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत आत्तापर्यंत कोणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नाही.

- Advertisement -

पालघर परिसरात एसटी महामंडळाकडून रातराणी या बसेसच्या फेऱ्या सुरु असतात. भुसावळ ते बोईसर या एसटीचा वाघोबा खिंडीत पहाटे सहा वाजता अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी चालक मंद्यधुंद अवस्थेत होता. प्रवाशांनी यावेळी चालकावर आक्षेप घेतला, त्यांनी एसटीच्या कंडक्टरलाही तक्रार केली, मात्र तरीही चालक एसटी सुसाट चालवत होता. मात्र कंडक्टरने त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे प्रवाशांचे मत आहे.

- Advertisement -

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच जखमींना तात्काळ बस मधून बाहेर काढत पालघरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान प्रवाशांच्या या दाव्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.


Ajmer Dargah Controversy आता अजमेर शरीफ दर्ग्यातही शिव मंदिर असल्याचा दावा; परिसरातील बंदोबस्तात वाढ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -