Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरPalghar MIDC Fire : तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला आग

Palghar MIDC Fire : तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला आग

Subscribe

पालघरमधील बोईसर पूर्वेकडील रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये या धागा कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

पालघर : पालघरमधील बोईसर पूर्वेकडील रिस्पॉन्सिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये या धागा कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. (Fire breaks out in factory godown in Tarapur MIDC.)

हेही वाचा : Sanjay Raut : शिंदे, फडणवीसांना हाताशी धरून अदानींचा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप

- Advertisement -

बोईसर पूर्वेकडील बेटेगाव – महागाव रस्त्यावरील एक धागा उत्पादन तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचवून आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही घटना पहाटे साडेसात वाजताच्या सुमारास घडली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळील बेटेगाव येथील धागा उत्पादन करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला आग लागली. या आगीमुळे गोदामातील कच्चा आणि तयार माल जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला.

- Advertisement -

हेही वाचा : Praniti Shinde : “प्रणिती शिंदे गद्दार, तिला लाज, लज्जा नाही, तुझ्या बापालाही…”, उद्धव ठाकरेंचा नेता भडकला

गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसत असल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. संपूर्ण बोईसर परिसरात काळा धूर पसरल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागला. तीन तासानंतर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने कोणत्याही प्रकारचे जीवित हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Fire breaks out in factory godown in Tarapur MIDC.)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -