पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारकडून सीबीआयकडे हस्तांतरणास मंजुरी

palghar mob lynching case transferred to cbi maharashtra government gives affidavit
पालघर साधू हत्या प्रकरण

पालघर साधू हत्याकांड प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास हस्तांतरण करण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भातील शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास मंजुरी असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २०० जणांना अटक करण्यात आली आहे. तर नोव्हेंबर 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या 58 जणांना जामीन मंजुर केला आहे. तर डिसेंबर 2020 मध्ये यातील 47 आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यापूर्वी आरोपींविरोधात ठोस पुरावे जमा करण्यासाठी सीआयडीने 808 संशयितांची चौकशी केली. तसेच 108 साक्षीदारांविरोधात जबाब नोंदवला होता.

नेमक प्रकरण काय?

16 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री सुरतकडे जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या गाडी चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांना अटक केली, यातील 11 आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले तर 30 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.