घरताज्या घडामोडीमहंतांच्या मॉब लिंचिंगचे तीव्र पडसाद; आखाडा परिषद, नागा साधूंचा आंदोलनाचा इशारा

महंतांच्या मॉब लिंचिंगचे तीव्र पडसाद; आखाडा परिषद, नागा साधूंचा आंदोलनाचा इशारा

Subscribe

आखाडा परिषदेने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

पालघर येथे गुरुवारी रात्री मॉब लिंचिंगच्या घटनेत मृत्यू झालेल्या त्र्यंबकेश्‍वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे महंत कल्पवृक्षगिरी व महंत सुशीलगिरी महाराज यांना शनिवारी मध्यरात्री त्र्यंबकेश्‍वर येथे समाधी देण्यात आली. दरम्यान, या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्र सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची तोफ डागली आहे. आरोपींवर कडक कारवाई करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा आखाडा परिषद तसेच नागा साधूंनी दिला आहे.


हेही वाचा – कोरोनाबाधित पत्रकारांना भाजप सर्वतोपरी मदत करेल – चंद्रकांत पाटील

- Advertisement -

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी तसंच श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष महंत प्रेमगिरी यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. आखाडा परिषदेने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असताना त्यांच्याच सत्ताकाळात वयोवृद्ध महंतांची जमावाकडून ठेचून हत्या होते, ही शरमेची बाब असल्याचं म्हटलं आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा लॉकडाऊननंतर तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषद तसेच नागा साधूंनी दिला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -