Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाकरे पुन्हा अडचणीत? पालघर साधू हत्या प्रकरण CBIकडे देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ठाकरे पुन्हा अडचणीत? पालघर साधू हत्या प्रकरण CBIकडे देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ काही साधुंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे साधू हत्याप्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी वारंवार भाजपाकडून केली जात होती.

काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ काही साधुंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे साधू हत्याप्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी वारंवार भाजपाकडून केली जात होती. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने ठाकरे गट पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधूंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारने नवे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले. (Palghar Monk Lynching Case Transferred To Cbi After Eknath Shinde Governments Application)

- Advertisement -

ज्यावेळी साधूंची मारहाण करून हत्या केली होती. त्यावेळी प्राथमिक तपास करून पालघर पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे दिले होते. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारने अधिक हालचाली केल्यानंतर हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, या साधुंच्या हत्येनंतर मागील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

16 एप्रिल 2020 रोजी पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती.

प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु होता. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपाकडून करण्यात येत होती. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती.


हेही वाचा – ‘पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा’, पंतप्रधानांनी वाहिली गिरीश बापटांना श्रद्धांजली

- Advertisment -