घरमहाराष्ट्रपालघरमध्ये शिवसेनेला खिंडार; खासदार, आमदार, नगरसेवकांसह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

पालघरमध्ये शिवसेनेला खिंडार; खासदार, आमदार, नगरसेवकांसह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

Subscribe

बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवकांसह, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे

एकनाथ शिंदे यांच्यासह ४१ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. यात शिवसेनाला सर्वात मोठा धक्का बसला. एकाच वेळे दोन तृतींश आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. अशात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार पदाधिकारी, नगरसेवक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत पुन्हा पक्षबांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. अशात आता पालघरमधूनही शिवसेना मोठा धक्का देण्यात आला आहे. पालघरमधील शिवसेनेच्या मोठ्या गटाने शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, माजी जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.

हेही वाचा : मंत्रिपदासाठी शिंदे गटात चढाओढ, मराठवाड्यातील आमदारांचा शक्तिप्रदर्शनाचा धडाका

- Advertisement -

इतकेत नाही तर बहुतांश जिल्हापरिषदेचे इतर सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त देखील शिंदे गटात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारीच बाहेर पडल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे प्रत्यक्षात सर्व नेते, पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. तर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडूनही महाराष्ट्राभर दौरे करत पक्षांची बांधणी सुरु आहे. अशात पालघरमधील मोठा गट शिवसेनेत सामील झाल्याने या जिल्ह्यातही शिवसेना प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिकेतील 5 नगरसेवक, जिजाऊ संघटनेचे विक्रमगड नगरपंचायत 19 नगरसेवक, जिजाऊ संघटनेचे तलासरी नगरपंचायत 5 नगरसेवक आणि मोखाडा नगरपंचायतीचे तब्बल 12 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर, जिल्ह्यातील वसई तालुका आणि बोईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर तसेच उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे, बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संखे हे सुद्धा आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा :  आमच्यावर टीका करणाऱ्यांवर किती केस आहेत विचारा, मुख्यमंत्री शिंदेंचा नेमका निशाणा कोणावर?

दरम्यान पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेचे दिवंगत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना मानणार आहे. मात्र बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवकांसह, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षविरोधी कारवाई प्रकरणी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांची पक्षश्रेष्ठींनी हकालपट्टी केली होती. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीमुळे आंदोलने झाली. त्यावेळी मात्र राजेश शहा अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेची होती. यात आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराज शिवसैनिकांनीही आता शिंदे गटाची वाट धरली आहे.

रत्नागिरीतील 12 नगरसेवकही शिंदे गटात सहभागी 

याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातीलदापोली तसेच मंडणगड नगरपंचायतीतील शहर विकास आघाडीतील १२ नगरसेवकांनी  देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने या नगरसेवकांनी युती सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. दापोली आणि मंडणगड परिसरात शिवसेनेसाठी समर्पित कार्य करूनही त्यांना अंतर्गत राजकारणाला सामोरे जायला लागत होते. अखेर अन्यायास कंटाळून या सर्वांनी युती सरकारला पाठिंबा जाहीर केल्याची पोस्ट एकनाथ शिंदे यांनी केली आहे.


आता 48 तासात कोरोना होणार नष्ट; ग्लेनमार्कने प्रभावी औषध बनवल्याचा दावा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -