घरक्राइमपालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा; आरोपी मिट्टू सिंहला अटक

पालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा; आरोपी मिट्टू सिंहला अटक

Subscribe

पालघरची MBBS विद्यार्थीनी सदिच्छा साने ( वय२२) बेपत्ताप्रकरणात एका मोठा उलघडा झाला आहे. आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छा सानेची हत्या करत तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत त्याने हा जबाब नोंदवला आहे. पालघरच्या बोईसरमधील वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा साने 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली, नंतर हे प्रकरण बांद्रातील बँडस्टँड पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आले.

आरोपी मिट्टू सिंहने सदिच्छा सानेची हत्या करुन तिचा मृतदेह बँडस्टँड समुद्रात फेकून दिल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा तब्बल 14 महिन्यांनंतर उलघडा झाला आहे. मृत सदिच्छा साने आणि आरोपी मिट्टू सिंहचा बँडस्टँडवरील शेवटचा सेल्फी समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 9 च्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येसाठीचा कलम (302) आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलम 201 जोडलं आहे. पोलीस ही हत्या नेमका का केली? त्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास करत आहेत.

- Advertisement -

मुंबई पोलीस शुक्रवारी नौदल अधिकाऱ्यांच्या मदतीने समुद्रात मृतदेहाचा शोध घेणार आहेत. आरोपीच्या जबाबानुसार, त्याने सदिच्छा सानेची हत्या करत मृतदेह सुमारे 150 ते 200 मीटर अंतरावर बँडस्टँडजवळील समुद्रात फेकून दिला. मात्र त्याने ही हत्या का केली त्यामागचा हेतू काय हे अद्याप स्पष्ट केलं नाही.

- Advertisement -

सदिच्छा साने दक्षिण मुंबईतील जे जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती, 29 नोव्हेंबर 2021 रोजी ती परीक्षेसाठी जाते सांगून घरातून निघाली, पण ती माघारी परतलीच नाही. यावेळी सदिच्छाच्या कुटुंबियांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, सदिच्छाला बेपत्ता होऊन पंधरा दिवस पूर्ण झाले त्यानंतरही तिच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. यावेळी कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला, यावेळी तिचा काहीच पत्ता लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला, तांत्रिक पुराव्यांवरुन तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलिस ठाण्यातही धाव घेतली. गुन्हे शाखा युनिट 9 ने याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतानाच पोलिसांनी 100 पेक्षा अधिक जणांची चौकशी देखील केली. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिट्टू सिंगने पाहिले होते.


Live Update : बुलढाण्यातील देऊळगावजवळील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -