घरताज्या घडामोडीpalghar ZP election result 2021 : पालघरमध्ये शिवसेना खासदारपुत्र रोहित गावितचा पराभव,...

palghar ZP election result 2021 : पालघरमध्ये शिवसेना खासदारपुत्र रोहित गावितचा पराभव, भाजपचा उमेदवार विजयी

Subscribe

भाजपचे पंकज कोरे विजयी झाले असून गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

पालघरमधील वणई तालुक्यातील वणई जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालावर अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावतला उमेदवारी देण्यात आली होती. रोहित गावितचा या निवडणुकीत पराभव झाला असून भाजपचे उमेदवार पंकज कोरो यांचा विजय झाला आहे. शिवसेनेने स्थानिक उमेदवाराला वगळून प्रतिष्ठा पणाला लावली होती. रोहित गावित यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वसई पंचायत समितीतही सत्तापरिवर्तन झाले असून शिवसेनेची सत्ता गेली असून बहुजन विकास आघाडीचे सत्ता आली आहे.

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा दारुण पराभव झाला. याठिकाणी भाजपचे पंकज कोरे विजयी झाले असून गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. वणई जिल्हा परिषद गटातून गावितांनी मुलगा रोहितला मैदानात उतरवले होते. त्यामुळे शिवसेनेत असंतोष होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम निकालातून दिसून आला. रोहित गावित तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. याठिकाणी भाजपचे पंकज कोरे विजयी झाले. रोहित गावित यांचा १३०० मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा वायेडा यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

- Advertisement -

रोहित गावित यांची प्रतिक्रया

वणलीमधून रोहित गावित यांनी निवडणूक लढवली असून त्यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांनी राजेंद्र गावित यांना धुळ चारली आहे. रोहित गावित यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित गावित यांनी भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच रोहित यांनी म्हटलं आहे की, छोट्या कालावधीमध्ये बरीच मेहनत घेतली आहे. अत्यंत कमी मतांनी पराभव झाला आहे परंतु लोकांनी दिलेलं प्रेम दिसत असल्याचे रोहित गावित यांनी म्हटलं आहे.

एकनिष्ठ असून विकासाची कामे अशीच पुढे सुरुच राहतील असेही रोहित गावित यांनी म्हटलं आहे. पहिल्यांदाच निवडणुक लढवली असल्याचेही रोहित यांनी सांगितले. पालघरमधील वणई गटाचा निकाल सर्वात महत्त्वपुर्ण मानला जात होता. कारण शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित या मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. परंतु या निवडणुकीमध्ये रोहित गावितचा पराभव झाला असून भाजप विजयी झाली आहे.

- Advertisement -

रोहित गावितांच्या उमेदवारीला होता विरोध

पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि स्थानिक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली होती. यामुळे स्थानिक माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे बंडखोरी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, गुलाल कुणाचा? राज्याचं लक्ष


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -