पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यातही दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून जिल्हातील एकून 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Panchganga river

राज्यात अनके ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. जिल्हातील एकून 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा अशार दिला आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांच्या वर पोहोचली आहे. ही पाणी पातळी 39 फुटांवर पोहोचली तर इशारा पातळी समजली जाते. नदीची पाणी पातळी 34 फुटांवर गेल्यावर ती धोका पातळी समजली जाते. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ज्या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर NDRF च्या दोन टीम कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. एक टीम कोल्हापूर शहर तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यामध्ये तैनात करण्यात आली आहे. राधानगरी धरणाच्या कृत्रिम दरवाजातून 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सोडला आहे.

जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.