घरमहाराष्ट्रआता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणार 'पांडे मॉड्युल'

आता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणार ‘पांडे मॉड्युल’

Subscribe

गेल्या चार वर्षात बेपत्ता झालेल्यांचा मुंबई पोलीस आता हवालदार 'पांडे मॉड्युल'च्या माध्यमातून शोध घेणार आहेत.

मुंबई शहरात मुलींच्या अपहरणामध्ये वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीमध्ये सन २०१३ प्रमाणे २०१७ सालामध्ये सुद्धा मुलींच्या अपहरणात आणि हरवण्याचा प्रमाणात तब्बल १५ पटीने वाढ झाल्याचे उघड झाले आहे.

२०१३  सालापासुन गायब झालेल्यांची आकडेवारी

२०१३ पासून २०१७ पर्यंत एकूण ३३९० मुलांचे अपहरण झालेले आहे. यामध्ये आतापर्यंत ३१३१ मुलांना शोधण्यात आले आहे पण अजूनही २५९ मुले मिळाली नाहीत. तसेच सन २०१३ पासून सन २०१७ पर्यंत एकूण ५०५६ मुलींचे अपहरण झालेले होते यामध्ये आतापर्यंत ४६८६ मुली सापडल्या असुन अद्यापही ३७० मुली सापडल्या नाहीत.

- Advertisement -

गेल्या चार वर्षात एकूण ६५१० पुरुष हरवले होते त्यात आतापर्यंत ५३२२ पुरुष मिळाले आहेत. पण अजूनही ११८८ पुरुष मिळाले नाहीत. त्याचबरोबर एकूण २८३९ स्त्रिया हरवल्या होत्या त्यामध्ये आतापर्यंत २३०९ स्त्रिया सापडल्या असून अजूनही ५३० स्त्रिया बेपत्ता आहेत. यावरुन गेल्या चार वर्षात मुंबई शहरातून हरविलेल्या ६२९ मुले-मुली आणि १७१८ महिला-पुरुष व्यक्तींचा शोध लागलेला नाही. हि बाब अतिशय गंभीर आहे.

हरवलेल्यांना शोधण्याकरीता हवालदार ‘पांडे मॉड्युल’

हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिस आता मुंबईत ‘पांडे मॉडयुल’ राबवणार आहेत. मालाड पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक ‘राजेश कालिदिन पांडे‘ यांनी आतापर्यंत ६५० हून अधिक बेपत्तांचा शोध घेतला आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीचे धडे गुन्हे शाखा आणि मिसिंग पर्सन ब्युरोसह सर्व पोलिस ठाण्यांना दिले जाणार आहेत.

- Advertisement -

कोण आहेत हवालदार राजेश पांडे?

हवालदार राजेश पांडे हे मालाड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २०११ साली  सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तैनात असल्यापासून त्यांना बेपत्ता मुलांचा शोध घेण्याची आवड निर्माण झाली. लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांनी शोध घेतला होता. तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रसह, गुजरात, बिहार, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, रांची, येथील मुलांची त्यांनी घरवापसी केली होती. लोकेशन आणि व्हॉटसऍपच्या मदतीने ते बेपत्ता लोकांचा शोध घेतात. काही दिवसांपूर्वी मालाड येथे लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता.तेव्हाही पांडे यांच्या कौशल्यामुळे आरोपीपर्यंत पोलिस पोहचले होते.आजही त्यांना पर राज्यातल्या पोलिस ठाण्यातून बेपत्तांच्या शोधाच्या मदतीकरता फोन येतात.

बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान ही मोहिम हाती घेतली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. हरवलेल्या मुलांचा जास्तीत जास्त शोध घेण्यावर मुंबई पोलिसांनी भर दिला आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत बेपत्ता मुलांचा शोध घेण्यावर चर्चा झाली. चर्चे दरम्यान मालाड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजेश पांडे हे कसे शोध घेतात, याचे धडे सर्व पोलिसांना देण्याचे ठरले आहे. म्हणुनच मुंबई पोलीसांतर्फे ‘पांडे मॉडयुल’ तयार करण्यात आले आहे लवकरच पांडे मॉडयुल्सचे प्रशिक्षण पोलिसांना देऊन बेपत्तांना शोधणारी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

वाचा- विशाल ठक्करला शोधणार हवालदार पांडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -