घरCORONA UPDATEपंढरीची चैत्र वारी रद्द, १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद

पंढरीची चैत्र वारी रद्द, १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद

Subscribe

चैत्र वारीसाठी दरवर्षी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक पंढरीत येतात. जवळपास ३ ते ४ लाख भाविकांची चैत्र वारीनिमित्त पंढरीत मांदियाळी जमत असते.

“भेटी लागे जीवा .. लागलीस आस“ अशी आर्त विनवणी करीत भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या चार वारींना अनन्यसाधारण महत्व असते. यामध्ये चैत्र वारीसाठी दरवर्षी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक पंढरीत येतात. जवळपास ३ ते ४ लाख भाविकांची चैत्र वारीनिमित्त पंढरीत मांदियाळी जमत असते. परंतु कोरोना व्हायरसमुळे वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे. ४ एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

मात्र, सध्या देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. जनसंपर्कातून या विषाणूचा प्रादुर्भाव अधिकच होत असल्यामुळे हे टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. तर राज्य सरकारने देखील जिल्हा बंदीचा आदेश आहेत. या सर्व बाबींचा विचार करता भाविकांनी पंढरीत वारीसाठी येऊ नये म्हणून चैत्र वारी रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. याशिवाय येथील महाराज मंडळीनी भाविकांनी वारीसाठी पंढरीत येऊ नये, असे आवाहन केले होते.

- Advertisement -

१४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद

मंदिर समितीने १७ मार्च ते ३१ मार्च अखेर श्री विठ्ठल –रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता १४ एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र, देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे.

यांनी दर्शविली सहमती

तर समितीचे सदस्य आमदार राम कदम , आमदार सुजितसिंह ठाकुर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, भास्करगिरी महाराज, दिनेशकुमार कदम, माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आदींनी या निर्णयास सहमती दर्शवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -