Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Pandharpur Accident: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; तीन भाविक ठार, 7 गंभीर जखमी

Pandharpur Accident: देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; तीन भाविक ठार, 7 गंभीर जखमी

Subscribe

विठोबा, रखुमाईच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परतत असताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 भाविक ठार झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंढरपूर येथून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. विठोबा, रखुमाईच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परतत असताना भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 भाविक ठार झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. 22 मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले तर 7 भाविक गंभीर जखमी आहेत. ( Pandharpur Accident Returning from Devadarshan Three devotees killed 7 seriously injured )

स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या भाविकांना पुढील उपचारांसाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. वाहनचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. 21 मे रोजी रात्रीपासून भाविकांचा हा प्रवास सुरु होता. भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

- Advertisement -

( हेही वाचा: गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, स्वतंत्र ठाणे स्थानकाबाबत करणार नियोजन )

पुण्यातही अपघात 

पुण्यात व्हॅनिटी व्हॅनचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, पाच जखमी. महाराष्ट्राच्या पुण्यात एक दुर्घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक निकामी झाल्याने या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ब्रेक निकामी झाल्याने इतर अनेक वाहनेही व्हॅनच्या तावडीत आली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 6 वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना पॅलेस ऑर्चर्ड सोसायटी, एनआयबीएम-उंद्री रोड, कोंढवा येथे घडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -