घरमहाराष्ट्रएकनाथांच्या हातून होणार विठ्ठलाची महापूजा, देवस्थान समितीकडून निमंत्रण

एकनाथांच्या हातून होणार विठ्ठलाची महापूजा, देवस्थान समितीकडून निमंत्रण

Subscribe

महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. यामुळे राज्यात आता शिंदे – फडणवीस सरकार बहुमताने कामाला लागले आहे. राज्यात एकीकडे राजकीय घडमोडी घडत असताना दुसरीकडे वारकऱ्यांना आषाढी एकादशीचे वेध लागले आहेत. दरवर्षी आषाधी एकादशीला पंढपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. आता आषाढी एकादशीला राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापूजा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.

- Advertisement -

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुभ दीप या त्यांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. या भेटीवेळी त्यांना आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन सन्मान करण्यात आला. या पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे येत्या 10 जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक महापूजा पार पडणार आहे.

- Advertisement -

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूर प्रांत अधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अधिकार गजानन गुरव तसेच मंदिर समिती सदस्य उपस्थित होते. राज्यातील राजकीय घडमोडी पाहता आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार यावरून चर्चा रंगत होत्या. पण एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाल्याने ते यंदाची महापूजा करणार आहेत.


नुपूर शर्मांविरोधातील सुप्रीम कोर्टाची टिपण्णी अपमानास्पद; ११७ मान्यवरांचे पत्र

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -