Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Pandharpur by-Election 2021: पंढरपूर पोटनिवडणूकीत बंडाचे झेंडे, बंडखोर शैला गोडसे शिवसेनेतून निलंबित

Pandharpur by-Election 2021: पंढरपूर पोटनिवडणूकीत बंडाचे झेंडे, बंडखोर शैला गोडसे शिवसेनेतून निलंबित

राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाची बंडखोरी

Related Story

- Advertisement -

पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त होती. या जागेवर विधानभा पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता यावेळी काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. या शेवटच्या दिवशी एकूण ४४ अर्ज दाखल झाले आहेत.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी भाजप,राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपमध्ये पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या पतीने बंडखोरी केली आहे. साधना भोसले भाजप उमदेवाराच्या कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांच्या पतीने उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. तसेच सिद्धेश्वर औताडे यांनीही बंडखोरी करत भाजपला एक आव्हान दिले आहे. सिद्धेश्वर औताडे हे भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांचे चुलत भाऊ आहेत.

शैला गोडसे शिवसेनेतून निलंबित

- Advertisement -

पंढरपूर पोटनिवडणूकीमध्ये बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या शैला गोडसे यांना निलंबित करण्यात आले आहे. शैला गोडसे सोलापूर जिल्हा परिषद सदस्य असून कार्यकर्त्यांच्या दबावामुळे आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच प्रचारालाही सुरुवात केली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शैला गोडसेंनी महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आंदोलने केली आहेत.

राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाची बंडखोरी

पंढरपूर निवडणुकीत राष्ट्रवादीलाही बंडखोरीचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाकडून बंडखोरी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. सचिन पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर आणि मंगळवेढामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे. त्यामुळे राजू शेट्टी कसून तयारी करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडणूकीत धक्का बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पोटनिवडणूकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठींबा देत आहे. परंतु बंडखोर उमेदवार आणि मतदार संघाशी संबंध नसलेल्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपसमोर अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisement -