Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंढरपूर पोटनिवडणूक: अजित पवारांच्या सभेतील गर्दीप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

पंढरपूर पोटनिवडणूक: अजित पवारांच्या सभेतील गर्दीप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

हिम्मत असेल तर अजित पवारांवर गुन्ह दाखल करा - चंद्रकांत

Related Story

- Advertisement -

पंढरपूर पोटनिवडणूकीच्या निमित्ताने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पंढरपूरमध्ये सभा घेतली या सभेत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र दिसले. अजित पवारांनी घेतलेल्या सभेचे दृश्य माध्यमांतून समोर आल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु राज्य सरकारमधील मंत्र्यांना याचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्यांसाठी एक न्याय आणि राज्यकर्त्यांसाठी वेगळा न्याय असे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली होती. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या टीकेमुळे अखेर प्रशासनाने उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या श्रीकांत शिंदेंवर कारवाई केली आहे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

पंढरपूरमध्ये कल्याणराव काळे यांच्या पक्षप्रवेशावेळी सभा घेण्यात आली, या सभेला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेला हजेरी लावली होती. परंतु गर्दी पाहूनही अजित पवारांनी सभा घेतली. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरत आहे यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये सभा,मेळावे किंवा गर्दी करण्यास बंदी आहे. असे असताना नेत्यांच्या कार्यक्रमाला मात्र शेकडो लोकांची गर्दी होते. यामुळे गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. तसेच रात्री उशीरा सभेचे आयोजक श्रीकांत शिंदेंवर कारवाई करत भादवी कलम १८८,२४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिम्मत असेल तर अजित पवारांवर गुन्ह दाखल करा

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही. हिम्मत असेल तर अजित पवारांवर गुन्हा दाखल करावा, अजित पवार काही अकाशातून पडले नाहीत तेही सामान्य माणूस आहेत. उद्या मी( चंद्रकांत पाटील) किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियमांचे उल्लंघन केले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -