घरताज्या घडामोडीPandharpur By Election Result 2021 Live Updates : पंढरपूर ३१ व्या फेरीअखेर...

Pandharpur By Election Result 2021 Live Updates : पंढरपूर ३१ व्या फेरीअखेर आवताडे १५,६३५ मतांनी आघाडीवर

Subscribe

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आतापर्यंत ६ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये सर्वच दहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात जोरदार टक्कर प्रत्येक फेरीमध्ये देताना दिसत आहेत. संपुर्ण मतमोजणीनंतरचा निकाला रात्री उशिरापर्यंत लागू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे बडे नेते या निवडणुकीमध्ये भगीरथ भालकेंच्या पाठिंब्यासाठी अनेक ठिकाणी सभा घेताना दिसले. तर दुसरीकडे भाजपनेही देवेंद्र फडणवीस यांच्या एंट्रीच्या माध्यमातून या निवडणूकीत आणखीच चुरस आणली आहे. सुरूवातीच्या सहा फेऱ्यांमध्ये भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली असली तरीही समाधान आवताडेही प्रत्येक फेरीमध्ये चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. ही मतमोजणीची प्रक्रिया तब्बल १२ तास लागतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Pandharpur By Election Result 2021 Live Updates, BJP samadhan autade leading after sixth round of counting)

३१ व्या फेरीअखेर आवताडे १५,६३५ मतांनी आघाडीवर

अकराव्या फेरीनंतर समाधान आवताडे यांना १५०३ मतांची आघाडी मिळाली. तर १२ व्या फेरीनंतर १४१४ मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर तेराव्या फेरीत समाधान आवताडे यांना १०५९ मतांची आघाडी मिळाली. तर १५ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांना ३८०० मतांची आघाडी मिळाली. तर १६ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांना १२२८ मतांची आघाडी मिळाली. १६ व्या फेरीत समाधान आवताडे यांना ४५ हजार ९३४ मते मिळाली. तर भगीरथ भालके यांना ४५ हजार ९३४ मते मिळाली. पंढरपूर १८ व्या फेरीत आवताडेंची ४१०० मतांनी आघाडी. २३ व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे ५८०७ मतांनी आघाडीवर आहेत. तर २९ व्या फेरीनंतर ९२०० मतांनी आवताडे आघाडीवर आहेत. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार ३१ व्या फेरीअखेर आवताडे १५,६३५ मतांनी आघाडीवर आहेत.

- Advertisement -

१६ व्या फेरीनंतरची आकडेवारी

भाजप : समाधान आवताडे ४५ हजार ९३४
राष्ट्रवादी कॉंग्रेस : भगीरथ भालके ४४ हजार ७०६
अपक्ष उमेदवार : शैला गोडसे ५१
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 0
अपक्ष : सिद्धेश्वर अवताडे : १०

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरूवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी पुर्ण करण्यात आली. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर होते. तर त्यानंतरच्या सातव्या फेरीनंतर मात्र भाजपच्या समाधान आवताडे यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली आहे. सातव्या फेरीत समाधान आवताडे हे ८८३ मतांनी आघाडीवर होते. त्यानंतरच्या आठव्या फेरीतही समाधान आवताडे यांना २१६७ मतांची आघाडी मिळाली. नवव्या फेरीत आवताडे यांना २२२८ मतांची आघाडी तर दहाव्या फेरीअंती १८३८ मतांनी समाधाने आवताडे आघाडीवर होते. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर असणारे भगीरथ भालके हे सहाव्या फेरीनंतर पिछाडीवर जाताना दिसत आहे.

पंढरपूर मंगळवेळा पोटनिवडणूकीसाठी झालेल्यामतदानामध्ये ३ लाख ४० हजार ८८९ मतदारांपैकी एकुण २ लाख २४ हजार ६८ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघ निवडणूकीत ६५.७३ टक्के मतदान झाले. आज रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी प्रक्रियेसाठी एकुण ११८ अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. त्यामध्ये अधिकारी वर्गासह, कर्मचारी आणि मदतनीस अशा टीमचा समावेश आहे. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून या संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -