Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाविकास आघाडीला मोठा धक्का; पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी

महाविकास आघाडीला मोठा धक्का; पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे विजयी

Related Story

- Advertisement -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवार समाधान आवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले.

पंढरपूर पोट निवडणूक ही तीन पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होती. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा विजय होतील असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला असून अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांना धोबी पछाड देत बाजी मारली.

- Advertisement -

 

- Advertisement -