घरमहाराष्ट्रहे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; अजित पवारांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; अजित पवारांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज

Subscribe

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार पाडायचं माझ्यावर सोडा या वक्तव्याच्या सत्ताधाऱ्यांनी चांगलाच समाचार घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आता फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. सरकार पाडण्याच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, असा थेट इशाराच अजित पवार यांनी दिला.

अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे प्रचारसभा घेत आहेत. यावेळी त्यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला. “राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही,” अशा शब्दांत अजित पवारांनी फडणवीसांना खूल आव्हान दिलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल देखील प्रचारसभेत केली होती. यावरुन देखील अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला. आपला नाद करायचा नाय, एकतर आपण कुणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नाद केला तर त्याला असा तसा सोडत नाही, असा थेट इशाराच अजित पवारांनी फडणवीसांना दिला.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथील शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. ही सभा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भाषणांनी चांगलीच गाजली. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर होता. अजित पवारांनी फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देखील साडलं नाही. चंद्रकांत पाटील यांना देखील जोरदाला टोला हाणला. ‘चंपा’ असा उल्लेख करत ते उद्या या ठइकाणी येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -