घरमहाराष्ट्रराज्यात लॉकडाऊन मात्र पंढरपूर-मंगळवेढासाठी सवलत; काय आहेत नियम?

राज्यात लॉकडाऊन मात्र पंढरपूर-मंगळवेढासाठी सवलत; काय आहेत नियम?

Subscribe

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार आज १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होतील. मात्र, यातून पंढरपूर-मंगळवेढा मतदारासंघासाठी या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे पंढरपूरला मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. पण मतदान पार पडल्यानंतर या मतदारसंघातही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. राष्ट्रवादीकडू भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहेत नियम?

१) ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका नियोजित आहेत, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी अटी आणि शर्तींसह राजकीय सभांना परवानगी द्यावी.

२) भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून बंदिस्त ठिकाणी २०० व्यक्ती किंवा ५० टक्के क्षमता यापैकी जे कमी असेल त्यानुसार राजकीय सभा घेण्यास परवानगी दिली जाणार आहे.

- Advertisement -

३) सर्व मार्गदर्शक सूचनांचे कसोशीने अनुपालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकारी राजकीय सभांच्या ठिकाणी अधिकारी नेमणार आहेत.

४) कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचा कोणत्याही प्रकारे भंग झाल्यास जागा मालक त्यासाठी जबाबदार असेल. त्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार दंड करण्यात येईल.

५) कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही नियमाचे २ पेक्षा जास्त वेळा उल्लंघन केल्यास त्या उमेदवाराला राजकीय सभा आयोजित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये.

६) संमेलने, कॉर्नर सभा इत्यादी अन्य कार्यक्रमांसाठी कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचं अनुपालन आवश्यक आहे.

७) कुठल्याही प्रकारचा पक्षपात किंवा भेदभाव न बाळगता निवडणुकीत सहभागी सर्व घटकांना सर्व मार्गदर्शक तत्वे सारखेपणाने लागू होतील. या मार्गदर्शक तत्वांचे निवडक अथवा पक्षपाती लागू करण्याबाबत कोणत्याही तक्रारीस जागा राहणार नाही, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी

८) मतदानाच्या दिवशी रात्री ८ वाजल्यानंतर या आदेशातील सर्व तरतुदी पूर्णपणे त्या क्षेत्रात लागू होतील.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -