घरताज्या घडामोडीनरभक्षक बिबट्याची दहशत; दोनवाडेत शेतात झोपलेल्या वृद्धास केले ठार

नरभक्षक बिबट्याची दहशत; दोनवाडेत शेतात झोपलेल्या वृद्धास केले ठार

Subscribe

नाशिकरोड : भगूरजवळील दोनवाडे गावात बिबट्याने सोमवारी पहाटे शेतात झोपलेल्या एका वृद्धावर हल्ला करुन ठार केल्याची घटना समोर आली असून या भागात आता नरभक्षक बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

दोनवाडे- नासाका रोडवर असलेल्ला शेतातील घराजवळ झोपलेल्या जिवराम गोविंद ठुबे (७०) यांच्यावर सोमवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागातील बिबट्या नरभक्षक झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात रुद्र राजेश शिरोळे या चिमुकल्याचा बळी घेतला होता. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -