घरमहाराष्ट्रPanjabrao Dakh: हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाब डख लोकसभेच्या रिंगणात

Panjabrao Dakh: हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाब डख लोकसभेच्या रिंगणात

Subscribe

परभणी: देशभरात 2024च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. या निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. प्रत्येक पक्षात जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. अशातच आता हवामानाचा अचूक अंदाज सांगणारे, पंजाबराव डख यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्यात आले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. (Panjab Rao Dakh Accurate weather forecaster Punjab Dakh in Lok Sabha arena)

पंजाबराव डख यांनी स्वत: परभणीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

महायुतीकडून जानकर रिंगणात

मागच्या काही दिवसांपासून परभणी मतदार संघ हा चर्चेचा विषय ठरला होता. कारण या जागेवर महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. जानकर हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार असं म्हटलं जात होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी महायुतीतून ही जागा लढवायचा निर्णय घेतला आहे.

कोण आहेत पंजाबराव डख?

पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचे आहेत. 1995 पासून ते टीव्हीवर हवामान अंदाज पाहायचे. पण टीव्हीवरील खोटे ठरणारे अंदाज आणि शेतीचं होणारं नुकसान यामुळे पंजाबराव डख यांनी हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं. पंजाबराव डख यांनी 1999 ला परभणीत कॉम्युटरचा कोर्स केला. परभणीला जाऊन कॉम्प्युटरवर सॅटेलाइटवर उपग्रहांच्या फोटोंवरून त्यांनी हवामानाचा अभ्यास करायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी 1999 पासून अचूक अंदाज वर्तवले आणि त्यासाठी ते प्रसिद्धही झाले. पंजाबराव डख यांनी मोबाईलवरून पावसाच्या अंदाजाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरूवात केली.

- Advertisement -

परभणीत आता महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आहे. त्यातच आता पंजाबराव डख यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय कितपत अचूक ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(हेही वाचा: Loksabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला; हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपा नाराज)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -