घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळ विस्तार : पंकजा मुंडेंची अनुपस्थिती खटकणारी, तावडेंची हजेरी

मंत्रिमंडळ विस्तार : पंकजा मुंडेंची अनुपस्थिती खटकणारी, तावडेंची हजेरी

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये शिंदे गटाच्या आणि भाजपच्या एकूण १८ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. तसेच भाजपचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. केंद्रातील काही मंत्री आणि सध्याच्या घडीला फारसे चर्चेत नसणारे विनोद तावेडीही सोहळ्याला उपस्थित होते. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या शपथविधी सोहळ्याला हजर नव्हत्या. त्याची अनुपस्थिती खटकणारी ठरली असून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेत्या मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे. कारण राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे मुंडेंना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र, त्यांना या दोन्ही निवडणुकीत डावलण्यात आलं. त्यामुळे त्या पक्षावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा होती.

- Advertisement -

शिंदे गटाने बंड केल्यानंतरही भाजपच्या होणाऱ्या बैठकांमध्ये पंकजा मुंडेंनी आवर्जुन भाग घेतला होता. मात्र, मुंडे राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या असून राज्यातील नेत्यांबदल्लची त्यांची कटुता दूर झाल्याचं सांगितलं जात होतं. परंतु आज पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अनुपस्थिती दाखवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण या देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या एकाही समर्थक आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्याला आल्या नसाव्यात असं सांगितलं जातं आहे. परंतु त्यांच्या अनुपस्थितीमुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -