घरCORONA UPDATEपंकजा मुंडे यांनी सांगितलं 'असा' साजरा करा गोपीनाथ मुंडेंचा पुण्यस्मरण दिवस!

पंकजा मुंडे यांनी सांगितलं ‘असा’ साजरा करा गोपीनाथ मुंडेंचा पुण्यस्मरण दिवस!

Subscribe

३ जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल.

३ जूनला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. मात्र यावर्षी राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी    पुण्यतिथीला घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या दिवशी काही मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ गडावर पुण्यातीथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. अशी पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये दिली.

- Advertisement -

३ जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दिला.

काय आहे पोस्टमध्ये

पंकजा मुंडे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, २ जूनला बाबा घरी पोटभर रस पोली खाऊन गेले होते. स्वत:च्या घरी तेच त्यांचे अखेरचे जेवण. ३ जूनला त्यांचे पार्थिव देखील घरी आणण्यात आले नाही. त्यामुळे 3 जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे. ३ जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांचा फोटो समोर उभे रहावे. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा,  तो काय हे मी सांगायची गरज नाही. त्याचप्रमाणे. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन ५ : तयारी झाली.. ‘या’ शहरात लॉकडाऊनमध्ये शिथीलता नाहीच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -