“हात पसरुन सत्ता, पदासाठी भीक मागणे आपली संस्कृती नाही”, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

pankaja munde comment gopinath munde not teach us to beg for post
"हात पसरुन सत्ता, पदासाठी भीक मागणे आपली संस्कृती नाही", पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

एखाद्यासमोर हात पसरुन पद आणि सत्तेसाठी भीक मागणे ही आपली संस्कृती नाही असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे सचिव आहेत. पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषदेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं का काय अशी चर्चा सुरु आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी एका कार्यक्रमादरम्यान केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेचा विषय ठरलं आहे. मला एखादे पद दिले आणि नाही दिले याने काही फरक पडत नाही. मात्र महत्वाचे म्हणजे सामाजिक कार्य करण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. असं वचनच वडिलांना दिलं असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच कोणासमोर हात पसरुन सत्ता आणि पदासाठी भीक न मागणे ही आपली संस्कृती नाही. माझ्या वडिलांनी तशीच शिकवण दिली असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय स्तरावर काही नेत्यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजप नेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी असं वक्तव्य केलं आहे. यामुळे पंकजा मुंडे पुन्हा नाराज झालेत का काय? अशी चर्चा सुरु आहे.

पंकजा मुंडे यांनाही प्रतिनिधित्व मिळेल – पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना देखील संधी मिळेल. आता चंद्रशेखर बावनकुळे यांना दोन वर्षानंतर संधी देण्यात आली आहे. विनोद तावडेंना राष्ट्रीय कामकाजात संधी देण्यात आली आहे. त्यांचेही तिकीट कापलं होते. परंतु पंकजा मुंडे यांनाही येणाऱ्या वर्षात संधी मिळेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.


हेही वाचा : mlc election: उमेदवारी अर्ज दाखल करताना बावनकुळेंना फडणवीसांची क्लीन चिट, फडणवीस म्हणाले…