उद्या काय होणार, काय मिळणार याची मला चिंता नाही – पंकजा मुंडे

Pankaja Munde commented on his candidature for the Legislative Council
उद्या काय होणार, काय मिळणार याची मला चिंता नाही - पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर स्मृतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदे निवडणूकीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी माझ्या पराभवाचेही सोने करात आले यापेक्षा काय हवे, असे वक्तव्य केले.

माझ्या पराभवाचंही सोने करता आले –

सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करुन नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचंही सोनं करता आलं यापेक्षा काय हवं. या पराभवानं मला दिल्लीला नेलं. शिवराजसिंहांसारखे सात्विक लोक लाभले, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी लाभो –

यावेळी त्यांनी महाविकासा आघाडी सरकारवर टीका केली. त्याम्हणाल्या तुम्ही मध्यप्रदेशात जी किमया करुन दाखवली, जे इतर कोणत्याही राज्याला जमले नाही. तुम्ही ओबीसी आरक्षण टिकून धरले. महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारची बुद्धी, प्रेरणा लाभो. शिवराजसिंह चौहान यांची प्रेरणा घेऊन त्यांनी ओबीसींची आरक्षण मिळवून द्यावे. राजकारणासाठी नाही तर ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण हवे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.