घरताज्या घडामोडीकार्यकरी अभियंत्याची स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

कार्यकरी अभियंत्याची स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Subscribe

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी केलेल्या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील बांधकाम विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कारभार समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळला असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे आहे असा सवाल करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे. अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर देण्याची मागणी केली आहे. धमक्या देऊन आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बिलांवर सह्या करण्यात येत असल्याचा अनागोंदी प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. यामुळे या अभियंत्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रिव्हॉल्वरची मागणी केली आहे. या मागणीमुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद सुरु झाला आहे.

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी केलेल्या मागणीमुळे बीड जिल्ह्यातील बांधकाम विभागात होणारा भ्रष्टाचार आणि कारभार समोर आला आहे. कंत्राटदारांना धमकावून आणि शस्त्राचा धाक दाखवून बिलांवर सही करुन घेतली जात आहे. या सगळ्या प्रकाराला कंटाळून अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

अभियंत्याने रिव्हॉल्वरची मागणी केल्यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला आहे. बीडमध्ये एखाद्या कार्यकारी अभियंत्याला अशी मागणी करण्याची वेळ येणं दुर्दैवी आहे. सत्ताधारी नेत्यांचे नियंत्रण जिल्ह्यावर राहिले नाही. मागील काही महिन्यांपासून वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय आणि खोट्या केस दाखल करणे, संस्थांवर दबाव टाकून प्रशासक आणण्याचे प्रकार सत्ता असल्यामुळे सर्रास सुरु असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्य़ात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी आहे. बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव,सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे यांची वैधानिक दखल घ्यावी अशी मागणीसुद्धा पंकजा मुंडे यांनी केली आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडेंकडून कोकणेंच्या मागणीची दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकारी अभियंता संजय कोकणेंच्या मागणीची दखल घेतली आहे. कोकणे यांना पोलिसांचा तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. जर जिल्ह्यात अशा पद्धतीने कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असले तर त्याची गय करणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समितीची स्थापना

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -