पंकजा मुंडेना येतेय वडिलांची आठवण; लहानपणीचा ‘तो’ फोटो केला पोस्ट

Pankaja Munde BJP Minister
छायाचित्र साभार - gettyimages

लोकसभेच्या निकालाची रणधुमाळी चालू आहे. सध्या मतमोजणीत भाजप बहुतेक जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातला बीड हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. सध्यातरी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे या आघाडीवर आहेत. त्यांनी १२ वाजेपर्यंत २ लाख ३ हजार मते घेतली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी १ लाख ४८ हजार मते घेतली आहेत. याचदरम्यान महिला व बाल विकास मंत्री पकंजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच भावनिक झाले आहेत.

 

२०१४ साली भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका अपघातात त्यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पंकजा मुंडे यांची धाकटी बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांनी मोठ्या मताधिक्याने बीडमध्ये विजय मिळवला होता. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुंडे यांना चांगलेच आवाहन दिले होते. मात्र तरिही प्रीतम मुंडे आघाडी टिकवून आहेत. त्यामुळेच या परिस्थितीत बाबांची आठवण मुंडे बहिणींना येत आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर लहानपणीचा एक फोटो अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्या फोनवर बोलत आहेत. पंकजा यांनी त्याला फोटोला ‘हॅलो बाबा’ असे कॅप्शन दिले आहे. त्यावरूच त्यांची कमतरता पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना जाणवत असल्याचे दिसून येत आहे.