घरमहाराष्ट्र'तू दबे पांव चोरी छुपे मत आना, तू सामने से वार कर'

‘तू दबे पांव चोरी छुपे मत आना, तू सामने से वार कर’

Subscribe

सावरगाव येथील मेळाव्यात पंकजा मुंडे यांना समर्थकांना भावनिक आवाहन केले आहे. शिवाय, तू दबे पांव चोरी छुपे मत आना, तू सामने से वार कर अशा शब्दात देखील त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.

सावरगावातील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा भावनिक आव्हान केलं. सावरगावातील दसरा मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायाला मिळाली. वाघाच्या पोटी वाघिणीचाच जन्म होणार अशा आक्रमक शैलीत पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला साद घातली. भगवान बाबांच्या प्रेमामुळे ही गर्दी उसळली असून भक्तीचा बाजार मांडणं हे संतांनी शिकवले नाही अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांची महती सांगितली. शिवाय, नगरमधून सीमोल्लंघन केले असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी उद्या अर्थात शुक्रवारी उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. तसेच उसतोड कामगारांसाठी १०० कोटींच्या निधीची देखील घोषणा केली. सध्या विभागात दुष्काळाची स्थिती गंभीर असून दुष्काळावर मात करण्यासाठी कंबर कसली असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, केवळ जनतेसाठी आपण असून मुंडे साहेबांनी तुमच्यासाठी पाहिलेले  स्वप्न साकार करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र

‘तू दबे पांव चोरी छुपे मत आना, तू सामने से वार कर’ अशा शब्दात पंकजा मुंडेंनी विरोधीपक्ष नेते आणि चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्यावर  टिका केली. दरम्यान, मुंडे साहेबांनंतरही मला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केला. २०१९मध्ये भाजपचीच सत्ता असून केवळ सर्व्हे पाहून नाही तर माणसं पाहून तिकीटं दिली जात असल्याचं पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितलं. माझ्या साखर कारखान्यातील शेतकऱ्याचे पैसे देण्याकरता माझ्या आईनं घरातील भांडी, जमिन गहाण ठेवली आणि शेतकऱ्यांचे पैसे मी भागवल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच भगवान गड आता भक्तीगड झाला असल्याचे भावनिक आव्हान देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -