घरCORONA UPDATEपंकजा मुंडे 'आयसोलेट'; ट्विट करत दिली माहिती

पंकजा मुंडे ‘आयसोलेट’; ट्विट करत दिली माहिती

Subscribe

राज्यातील विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे या आयसोलेट झाल्या आहेत. पंकडा मुंडे यांनी रात्री उशिरा ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकडा मुंडे यांनी रात्री ११.३१ च्या सुमारास ट्विट करत ही माहिती दिली. सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्यानं त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मात्र अद्याप त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अर्थातच महाविकासआघाडीने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या नव्या समीकरणांमुळे ही निवडणूक फार चुरशीची बनली आहे. औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -