पंकजांनी थेटच विचारलं, ‘माझ्याकडून काही चुकलं का?’

भाजप नेत्या पंकजा मुंडे आता पुढील निवडणूकांसाठी मैदानात उतरल्या आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.

Pankaja Munde

भाजप नेत्या पंकजा मुंडे आता पुढील निवडणूकांसाठी मैदानात उतरल्या आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. नुकतंच त्या बीडच्या परळीत जलजीवन मिशन योजनेच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा कार्यकर्त्यांसमोर केला.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुमच्या ताईमध्ये काय खोट असेल तर सांगा.की नको बाबा ताईचं नाव घ्यायला नको. लाजच वाटती नाव घ्यायला. असं काही असेल तर सांगा. काही माझ्याकडून चुकलं का ? माझ्यात काही खोट आहे का ? माझ्यामुळे काय नुकसान झाला आहे का ? असे प्रश्नही त्यांनी विचारले. शेजारच्या गावात गेले तर ते म्हणाले ताई तुम्ही फक्त महिला आहेत म्हणून मतदान केलं नाही.”

एवढा निधी देऊन सुद्धा? महिला काय करू शकत नाही, महिला विकास करू शकत नाही का ? जेवढं तुमच्या पुरुषांनी दिलं नाही, तेवढं ताईंनी दिलं..तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता त्याच्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हणतात का ? असा सवाल करत तुम्ही एकजुटीने साथ द्या. असं म्हणत पंकजा मुंडेंनी भाऊ धनंजय मुंडेवर निशाणा साधलाय.

तसंच येणाऱ्या निवडणुकीत या मुलीला राज्याच्या राजकारणात तुम्ही तिला मान खाली घायला लावू नकात. ग्रामपंचायतीत तुम्ही मुहूर्त मेड रोवली येणाऱ्या निवणुकीय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, लोकसभा, विधानसभा, या सर्व निवडणुकीत तुम्ही निश्चिय करा की 20 मार्च 2024 पर्यंत ताई म्हणतील त्याच नेत्यांना मतदान करा. असं आवाहनही पंकजा मुंडेंनी केलंय.