घरताज्या घडामोडीओबीसी आरक्षणाच्या श्रेयवादावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षाच्या पलिकडे जाऊन लढाई...

ओबीसी आरक्षणाच्या श्रेयवादावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षाच्या पलिकडे जाऊन लढाई…

Subscribe

ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तीवाद केला. यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी श्रेयवादात पडायचं नसून आनंद झाला असल्याचं सांगितलं. 

मला श्रेयवादात पडायचं नाही, प्रयत्न कोणाचेही असोत, पण मी आनंद साजरा करणार, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Pankaja Munde on OBC reservation)

ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तीवाद केला. यावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी श्रेयवादात पडायचं नसून आनंद झाला असल्याचं सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी राजकीय आरक्षण कसं मिळवलं? फडणवीसांनी दिला तपशील

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘या लढाईमध्ये ओबीसी समाजाने खूप संयम ठेवला. ओबीसीशिवाय निवडणूक म्हणजे काळा दिवस झाला असता. आमच्या सरकारने हे करून दाखवलं. ओबीसी हिताचं सरकार आल्यानं हे शक्य झालं. श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन ही लढाई आहे.ओबीसींसाठी कोण झटलं हे जनता बघते. महाविकासआघाडीने प्रयत्न केले नाही. इम्पिरिकल डेटा, जनसंख्या हीच कारणं दिली. पक्षाच्या पलिकडे कोर्टात युक्तीवाद झाला.’

- Advertisement -

हेही वाचा ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, 2 आठवड्यांत निवडणुका जाहीर करा : सर्वोच्च न्यायालय

फडणवीसांचा ठाकरेंना टोला

ओबीसी आरक्षण २०२० मध्येच मिळाले असते. ओबीसी आरक्षणावर स्थगिती आलीच नसती. मात्र, सरकार गंभीर नव्हतं. त्यामुळे ही प्रक्रिया रेंगाळली. परंतु आमचं महायुतीचं सरकार येताच आम्ही ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवलं, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत २०१९ पासून आतापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी काय काय घडलं याची सविस्तर माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीकाही केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -