Homeमहाराष्ट्रMunde Vs Dhas : पंकजाताई 'शिवगामीनी'चा डायलॉग मारत म्हणाल्या, 'मेरा वचन ही...

Munde Vs Dhas : पंकजाताई ‘शिवगामीनी’चा डायलॉग मारत म्हणाल्या, ‘मेरा वचन ही है मेरा शासन’, पण धसांनी केलेल्या आरोपांचं काय?

Subscribe

मुंबई : बीडमधील आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले. पण, सगळ्यांचं लक्ष होते, ते मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे. त्यातही पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना उद्देशून म्हणाल्या, ‘मेरा वचन ही है मेरा शासन…’ पण, पंकजा मुंडेंनी असं का म्हटले? धस आणि मुंडे यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष का लागले होते? दोघांत नेमका वाद काय झाला होता? हे जाणून घेणार आहोत.

सुरेश धस हे भाजपचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आपले गुरू मानतात. तर, पंकजा मुंडे यांना बहीण. परंतु, दोघांमधील वादाला सुरूवात झाली ती विधानसभा निवडणुकीपासून. पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, असा सुरेश धस यांचा आरोप होता. तेव्हापासूनच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले.

हेही वाचा : ‘मी जिवंत राहील किंवा नाही राहील, पण…’, फडणवीसांसमोर धस यांची फटकेबाजी

खरेतर सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर उभे होते. त्यांच्याविरोधात भिमराव धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यासह अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब आजबे हे लढत होते. तिरंगी लढतीत सुरेश धस यांनी बाजी मारली खरे, परंतु पंकजा मुंडे यांनी आपली ताकद भिमाराव धोंडे यांच्यामागे उभी केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.

“पंकुताई राजकारणात तुम्ही माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसला. प्रितमताईंनी शिट्टीला ( भिमराव धोंडे यांचे निवडणूक चिन्ह होते ) मतदान करा म्हणून फोन केले. मी तुमचा ( पंकजा मुंडे ) मान, सन्मान राखला होता. मी तुमच्याशी प्रामाणिक राहिलो. मी लोकसभेला तुमचे काम केले. पण, तुम्ही मात्र मला पाडण्यासाठी फोन केले,” असं म्हणून सुरेश धस यांनी धुरळा उडवून दिला होता.

सुरेश धस यांच्या आरोपानंतर पंकजा मुंडे यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. परंतु, पंकजा मुंडे यांनी वेळ आणि ठिकाण साधून सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर दिले, तेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर. बाहुबली चित्रपटातील शिवगामीनी पात्राचे डॉयलॉग मारत म्हणाल्या, ‘मी गोपीनाथ मुंडेंनी लेक आहे, बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही,’ असं ठणकावून पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं.

सुरेश धस यांनी आष्टीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांचा, ‘देवेंद्र बाहुबली,’ असा उल्लेख केला होता. यानंतर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीस यांना बाहुबली म्हणतात. काही वर्षांपूर्वी धस मला, शिवगामीनी म्हणत होते. शिवगामीनी ही बाहुबलीची आहे. सुरेश धस हे चित्रपटाचे डायलॉग मारतात, तसे आम्ही सुद्धा चित्रपटाचे डायलॉग मारतो. शिवगामीनीचे एक वाक्य असते, ‘मेरा वचन ही है मेरा शासन…’ आम्ही सुरेश धस यांना जाहीर वचन दिले, तेच माझे शासन आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही.”

एकप्रकारे पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना फडणवीस यांच्यासमोर प्रत्युत्तर दिले खरे. पण, विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांचं काय? धस यांनी हवेत आरोप केले होते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांवर राहणार आता भाजपचा ‘वॉच’, घेतला ‘हा’ निर्णय