…तर मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची चर्चा

maharashtra political crisis bjp leader pankaja munde said being unemployed in beed parali

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोदींबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसमध्ये वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत. मी देखील वंशवादाचं प्रतिक आहे. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. जर जनतेच्या मनात मी असेल तर मोदी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

राजकारणात आपल्याला वेगळेपण आणायचं आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु अलिकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. असं मुंडे म्हणाल्या.

यापूर्वी देखील पंकजा मुंडे यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. परंतु त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला डावलण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात रंगत आहे.


हेही वाचा : शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासाने वागले नाहीत, भाजपचा