मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही – पंकजा मुंडे

Pankaj Munde will interact with activists on the background of Legislative Council elections

गोपीनाथ मुंडेंचा (Gopinath Munde) आज ८ वा स्मृतिदीन आहे. आज पंकजा मुंडे विधानपरिषदेसंदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यामुळे गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही. तसेच मी कोणत्याही संधीसाठी प्रयत्नही करत नाहीये. कारण माझा तो स्वभाव नाहीये, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही

पंकजा मुंडे यांनी परळीतून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्यसभा असेल किंवा विधानपरिषद पंकजा मुंडेंचं नाव नेहमी चर्चेत असतं. मात्र पक्ष त्यांना संधी देत नाही?, या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कोणत्याही संधीची अपेक्षा करत नाही. तसेच मी कोणत्याही संधीसाठी प्रयत्नही करत नाहीये. कारण माझा तो स्वभाव नाहीये. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारणांमध्ये निश्चितच माझा नंबर नाहीये. जे मिळतं त्या संधीचं सोनं करून दाखवणे हे माझं काम आहे. तसेच हे आमचे संस्कार आहेत.

मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीये

मी सध्या राजकारणात नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीये. त्यांच्यासोबत संवाद करण्याची संधी मला मिळत असते. दसऱ्याला भगवानमूर्ती गडावर आणि गोपीनाथ गडावर संधी मिळत असते. वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प आम्ही घेतो. तसेच वेगवेगळ्या संकल्पनाची दिशा आम्ही ठरवत असतो. तसेच ही लोकांसाठी परंपरा झाली असून मी काय बोलेन हे मला तिथेच सुचत असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दिल्लीमध्ये मंत्रीपदं मिळावं यासाठी तीव्र इच्छा झाली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकांनाही मी तेच सांगितलं की, माझ्याविषयी लोकांची जी इच्छा आहे तीच माझी शक्ती आहे. अनेक नावे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे पक्ष काय निर्णय तो अंतिम असेल.

शिवराज सिंह आणि गोपीनाथ मुंडेंचे ऋणानुबंध

शिवराज सिंह चौहानांनी मध्यप्रदेशमधील ओबीसींचा तिढा सोडवल्यानंतर राज्यात येत आहेत, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज माननीय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान येथे येत आहेत. कारण त्यांचे आणि गोपीनाथ मुंडेंचे ऋणानुबंध आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये माझं मध्य प्रदेशसोबत निर्माण झालेलं नातं आणि आज ते येथे येणं यांच खूप सुंदर संगम आहे. एका ओसीबी समाजासाठी आणि वंचितांसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या नेत्यांच्या समाधी स्थळावर एक ओबीसींचा सुरक्षा देणारा नेता आज इकडे येत आहे. ओबीसी समाजासाठी मुंडे साहेबांनी त्यांचं आयु्ष्यपणाला लावलं. तसेच इतरांना राजकारणात संधी मिळावी, यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. त्यासाठी आम्ही शिवराज सिंह यांचा खास सन्मान आम्ही करणार आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


हेही वाचा : काश्मीर फाईल 2 काढा, सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण दाखवा, संजय राऊतांचा टोला