पंकजा मुंडें समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Pankaja Munde supporters blocked Praveen Darekar's convoy

तील विविध अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येते आहे. बीडमध्येही असाच प्रकार घडला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे समर्थकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. पंकाजा मुंडेंच्या नावाने कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती होती. प्रवीण दरेकरांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस हजर झाले. त्यानंतर कार्यकर्ते घोषणाबाजी करत निघून गेले.

कार्यकर्त्यांची घोषणा बाजी-

विरोधी पक्षनेते प्रवणी दरेकरांचा बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर पारगाव दरम्यान ताफा कार्यकर्त्यांनी आडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रविण दरेकर उस्मानाबादहून बीडच्या दिशेने निघाले होते. कार्यकर्ते पंकजा मुंडेंसाठी घोषणा देत होते. मुंडे साहेब अमर है… पंकजाताई अंगार है, बाकी सह भंगार है, अशा घोषणा समर्थक देत होते. दरेकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीसांनी दरेकरांचा ताफा मार्गस्थ केला.

यामुळे प्रवीण दरेकरांवर नाराजी –

20 जूनला रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी निवडणूक लढनार आहे. विधान परिषदेच्या एकूण दहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या यादीत पंकजा मुंडेंना डावलून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.