घरमहाराष्ट्रपंकजा मुंडे, तावडेंचं पुनर्वसन होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णीची शक्यता!

पंकजा मुंडे, तावडेंचं पुनर्वसन होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णीची शक्यता!

Subscribe

गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांपासून विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर कोणतीही प्रमुख जबाबदारी नाही. पंकजा मुंडे निवडणुकीत धनंजय मुंडेंकडून पराभूत झाल्या होत्या, तर विनोद तावडेंना तिकीट नाकारण्यात आलं होतं. मात्र, आता यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता असून त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि त्यांच्यासोबतच आशिष शेलार, संभाजी निलंगेकर पाटील आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत आहेत. या दौऱ्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघा प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यातल्या भाजप नेत्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश होण्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. मात्र, यापैकी किती नेत्यांना किंवा सर्व नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळते किंवा कसे, याविषयी काही दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकांनंतर उघडपणे पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ खडसे देखील होते. मात्र, आता या दोघांचीही राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. जे. पी. नड्डा यांनी या वर्षाच्या सुरुवातीला २० जानेवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. मात्र, त्यावेळी कोरोना लॉकडाऊनमुळे कार्यकारिणी जाहीर होणं लांबलं होतं. पण इतका मोठा कालखंड कार्यकारिणीशिवाय घालवल्यानंतर आता भाजपमध्ये कार्यकारिणी जाहीर करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -