घर उत्तर महाराष्ट्र दिमाखदार स्वागताने पंकजा मुंडे भारावल्या; शिव-शक्ति परिक्रमेचा नाशिक टप्पा प्रचंड यशस्वी

दिमाखदार स्वागताने पंकजा मुंडे भारावल्या; शिव-शक्ति परिक्रमेचा नाशिक टप्पा प्रचंड यशस्वी

Subscribe

नाशिक : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेस नाशिक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आल्याने पंकजा कमालीच्या भावूक झाल्या. कार्यकर्त्यांमधील उत्साह बघून त्यांना अश्रू अनावर झाले.

पंकजा मुंडे यांनी ‘शिवशक्ती परिक्रमा’ यात्रा काढली आहे. या यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास पंकजा यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी पाच ठिकाणे निश्चित केलेली असताना तब्बल ४५ ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या पुढील कार्यक्रमांच्या नियोजनावर परिणाम झाला. त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर नांदुरशिंगोटे, सिन्नर, संगमनेर मार्गी पुण्याकडे रवाना झाल्यात.

सत्ताधारी, विरोधक सगळे मिळूनच सरकारमध्ये सामिल

- Advertisement -

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवशक्ती परिक्रमा विरोधकांना रुचलेली नाही का, असा प्रश्न केला केला असता पंकजा यांनी, सध्या विरोधक कोण आहेत, हेच कळत नाही. सगळेच मिळून सरकारमध्ये आहेत, असे सांगितले. या परिक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मार्गाचा अवलंब करणार आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना देवाच्या भक्तीचा हा नवीन मार्गच आहे, असे सांगून त्यांनी विषयाला बगल दिली.

मला वाटले होते की या परिक्रमेत केवळ देव दर्शन होईल आणि कार्यकर्त्यांच्या भेटी होतील. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद माझ्या परिक्रमेला मिळाला आहे. रॅली झाली, ठिकठिकाणी सत्कार झाला. जेसीबीने फुले उधळली. माझा आवाज आज पहिल्यांदा खोल गेला आहे. नाशिकमधील स्वागताने मी भारावून गेली आहे. : पंकजा मुंडे, भाजप नेत्या

आदिशक्ती सप्तशृंगीचे दर्शन, त्र्यंबकराजा चरणीही लीन 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (दि.४) श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील आदिमाया श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन पंकजा मुंडे यांनी घेतले. यावेळी संध्याकाळची सात वाजताची महाआरती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच अभिषेक करून देवीला महावस्त्र साडी ओटी अर्पण करण्यात आली. यावेळी कळवण व सप्तशृंगी गड भाजपा कार्यकर्ते यांच्यातर्फे फटाक्यांच्या आतिषबाजीत फुलांचा वर्षाव करत मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मनज्योत पाटील यांच्यातर्फे शाल, श्रीफळ व देवीची प्रतिमा देऊन मुंडेंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (दि. ५) सकाळी मुंडे यांनी त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेत अभिषेक केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -