घर महाराष्ट्र पंकजा मुंडे पुन्हा उतरणार राजकीय आखाड्यात! सप्टेंबरमध्ये काढणार शिवशक्ती यात्रा

पंकजा मुंडे पुन्हा उतरणार राजकीय आखाड्यात! सप्टेंबरमध्ये काढणार शिवशक्ती यात्रा

Subscribe

मागील दोन महिन्यांपासून राजकीय ब्रेक घेत पंकजा मुंडे या राजकारणापासून पूर्णतः दूर गेलेल्या होत्या. परंतु आता दोन महिन्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याने सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीला त्यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे.

बीड : पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नावांपैकी एक. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्या कुठे तरी गायब झाल्या असल्याचे बोलण्यात येत होते. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्या चर्चेत असायच्या. राज्यात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यात मध्येच वावडे उठायचे ते पंकजा मुंडे या भाजपला रामराम करणार असल्याचे. पण अद्यापतरी त्यांनी पक्षाला रामराम केला नसून त्यांची निवड पक्षाच्या राष्ट्रीय पदी करण्यात आली आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून पंकजा यांनी राजकारणापासून स्वतःला लांब ठेवले होते. दोन महिने राजकारणापासून ब्रेक घेत असल्याची माहिती स्वतः पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आली होती. त्यामुळे त्या राजकारणात नेमक्या पुन्हा कधी सक्रीय होणार? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. परंतु आता त्या सप्टेंबरपासून पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Pankaja Munde will be active in politics by taking out Shiv Shakti Yatra in September)

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणे अशक्य; छत्रपती संभाजीराजेंच्या दाव्यावर रोहित पवारांनी भाजपावर साधला निशाणा

- Advertisement -

मागील दोन महिन्यांपासून राजकीय ब्रेक घेत पंकजा मुंडे या राजकारणापासून पूर्णतः दूर गेलेल्या होत्या. या कालावधीत त्या कुठेही दिसून आल्या नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नाही. परंतु आता दोन महिन्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याने सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीला त्यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. 11 दिवसांचा हा दौरा होणार असून या दौऱ्यानिमित्त त्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन देवदर्शन करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शिवशक्ती यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून त्या 10 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे हा दौरा राजकीय नसून हा केवळ दौरा केवळ देवदर्शनासाठी करण्यात येणार असल्याचे स्वतः पंकजा मुंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्यामध्ये त्या पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार असून त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठीचे दौरे करणार आहेत. परंतु दोन महिन्याच्या ब्रेकनंतर पंकजा मुंडे या खरंच कोणताही राजकीय फायदा न पाहता हा दौरा करणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षभरामध्ये राज्यात फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले. एकीकडे भाजपकडून इतर पक्षातील महत्त्वाचे नेते फोडण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र या पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये पंकजा मुंडे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. पंकजा मुंडे यांनी पक्षासाठी घेतलेली मेहनत ही कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही. परंतु गेल्या काही वर्षापासून त्यांना पक्षाकडून डावलण्यात येत असल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे पंकजा मुंडे या लवकरच भाजपला रामराम करणार असून त्या दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करण्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

तर पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची चर्चा देखील रंगली होती. परंतु आपण दिल्लीत कोणाचीही भेट घेतली नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. त्यानंतर पुढील दोन महिन्यासाठी त्या राजकारणातून ब्रेक घेत असल्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे दोन महिन्यानंतर राजकारणात सक्रिय होत असलेल्या पंकजा मुंडे आता पुढे नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतात? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

- Advertisment -