घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपंकजा मुंडेंची नाराजी हा आमच्या घरातला विषय : दानवे

पंकजा मुंडेंची नाराजी हा आमच्या घरातला विषय : दानवे

Subscribe

मंत्री दानवे यांचा याविषयी बोलण्यास नकार, २०१४ पर्यत देशातली गरिबी हटलीच नाही

नाशिक : पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने सध्या मुंडे नाराज आहेत ती नाराजी त्यांनी व्यक्तही केली. याबाबत केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता मुंडे यांची नाराजी हा आमच्या घरचा विषय आहे. त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे सांगत दानवे यांनी याविषयी अधिक बोलण्यास नकार दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भगूर येथील स्वातंत्रयवीर सावरकर यांच्या वाडयाला त्यांनी भेट दिली. तसेच सावरकर स्मारकासाठी आवश्यक निधीबाबत आपण पाठपुरावा करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी बोलतांना दानवे म्हणाले, स्वतंत्र मिळवण्यासाठी सर्वांनीच बलिदान दिले, घरदार सोडले, संसाराची राख रांगोळी झाली, अशांनी बलिदान दिले, त्यांचीही आठवण काढली पाहिजे, लोकांच्या पुढे त्यांचे बलिदान मांडल पाहिजे, त्यासाठी हार घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. याच साठी आज नाशिकमध्ये चिमुकल्यासह सर्वच जण तिरंग्यासाठी फेरीत सहभागी झालो आहोत. इतिहासाची उजळणी करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यामुळे मोदींनी ही संकल्पना मांडली, त्या त्या गावातले स्वातंत्र्य सैनिकांचे सन्मान करण्यास सांगितले आहे. शिवाय सर्व केंद्रीय मंत्री भेट देत आहेत, आपल्या देशाचा मंत्री स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येक पुढे ठेवत आहे. वीर स्वातंत्र्यवीर सारखे वीर जन्माला आले नसते तर आजही आपण गुलामीत असतो, ज्यांनी ज्यांनी देशासाठी काम केलं, त्यांचे विचार स्फूर्ती आपल्या तरुणांपर्यत पोहचवणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. मात्र देशातील गरिबी नरेंद्र मोदींच्या काळात कमी झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत भारतात गरिबी होती. त्यानंतर देशातील यांनी एकत्र यायचं ठरविले. आणि सर्व गरीब एकत्र झाल्यानंतर देशात गरिबांचा प्रधान मंत्री झाला. 2014 पर्यत गरिबी हटली नाही, त्यानंतर सर्व गरीब एकत्र झाले, नरेंद्र मोदींसारखा गरीब पंतप्रधान झाला.. त्यानंतर भारतातून प्रत्येक घर विकसित होऊ लागलं आहे. प्रत्येक घरात शिक्षण मिळू लागले आहे. त्यामुळे रोजगार मिळू लागला आहे. परिणामी गरिबी देशातून हद्दपार होते आहे. असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले दानवे

  • सावरकरांचं देशासाठी केलेलं बलिदान आपण आठवलं पाहिजे
  • अंदमानला ज्या कोठडीत सावरकर राहिले तिथे ७५ लोकांना घेऊन जाण्याचा संकल्प
  • सावरकर स्मारकासाठी जे जे करता येईल ते ते करू
  • ४०-४२ मंत्र्यांचे मंत्रीमंडळ असते, आता केवळ १८ मंत्री
  • केवळ १८ मंत्र्यांवर मंत्रीमंडळ चालू शकत नाही
  • लवकरच आणखी मंत्रीमंडळ विस्तार होईल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -