घरमहाराष्ट्रमोदीही मला संपवू शकत नसल्याच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण, म्हणाल्या...

मोदीही मला संपवू शकत नसल्याच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण, म्हणाल्या…

Subscribe

बीड – भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्याची कालपासून चर्चा सुरू आहे. मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत, अशा वक्तव्याचे त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.या सर्व प्रकरणावर पंकजा मुंडेंनी खुलासा केला असून मोदींचा उल्लेख सकारात्मक अंगाने केल्याचे त्यांनी म्हटले असून मोदीजींबद्दल कुठलाही नकारात्मक उल्लेख केला नसल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

याबाबत बोलताना मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने ऊपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदीजींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी  चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत असा सकारात्मक संदर्भ यामागे असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडेंचे ट्वीट काय –

ट्वीटमध्ये मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17sepपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights.आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे,”सनसनीखेज” बातम्यातून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या linkवर आहेच.धन्यवाद, असे म्हटले आहे.

- Advertisement -

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -