पुणे : मराठा आरक्षणासाठी फक्त आश्वासन पुरेसे नाही, असे सूचक विधान भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. सध्या पंकजा मुंडेंची ‘शिवशक्ती परिक्रमा’ यात्रा काढली आहे. या यात्रेचा मंगळवारी तिसरा दिवस होती. या यात्रेत पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले होते. यानंतर पंकजा मुंडे या जेजुरीकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलातना पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षण आणि जालन्याती घटनेसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.
मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाले, “मराठा समाज हा आरक्षणासाठी आक्रमक झाला असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करणे ही दुर्दैवी घटना होती. या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, असे मला वाटते. मराठा आरक्षणासाठी फक्त आश्वासन पुरेसे नाही. तर लीडरशीप पोटतून स्वीकारली पाहिजे. मराठी समाजाला आश्वस्त वाटणार कोणीतरी समोरे आले पाहिजे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
पंकजा मुंडे फडणवीसांच्या प्रश्नावर म्हणाल्या…
देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला निर्णय घेणार का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “आमच्या सरकार वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला होता. पण सर्वोच्च न्यायालयामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय अयशस्वी ठरला”, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – दिमाखदार स्वागताने पंकजा मुंडे भारावल्या; शिव-शक्ति परिक्रमेचा नाशिक टप्पा प्रचंड यशस्वी
सत्ताधारी-विरोधक सगळे मिळूनच सरकारमध्ये सामील
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवशक्ती परिक्रमा विरोधकांना रुचलेली नाही का, असा प्रश्न केला केला असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “सध्या विरोधक कोण आहेत, हेच कळत नाही. सगळेच मिळून सरकारमध्ये आहेत, असे सांगितले. या परिक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मार्गाचा अवलंब करणार आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना देवाच्या भक्तीचा हा नवीन मार्गच आहे”, असे सांगून त्यांनी विषयाला बगल दिली.