Homeमहाराष्ट्रकोकणNavi mumbai : पेटीएमच्या २४ रुपयाने उलगडले रेल्वे पोलिसाच्या हत्येचे गूढ

Navi mumbai : पेटीएमच्या २४ रुपयाने उलगडले रेल्वे पोलिसाच्या हत्येचे गूढ

Subscribe

वाशी रेल्वे पोलिसांनी (GRP Police) कसबपणाला लावून तपास केला. चौघा आरोपींना अटक करण्यात यश.

नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणार्‍या विजय चव्हाण यांचा मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकानजीक नव्या वर्षाच्या पहिल्याच पहाटे आढळला होता. चव्हाण यांचा खून करुन त्यांना मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलपुढे रेल्वे रुळावर फेकला. मात्र मोटारमनच्या सर्तकर्तमुळे आरोपींचा बनाव समोर आला आहे. या घटनेचा कोणताही पुरावा नसताना वाशी रेल्वे पोलिसांनी कसबपणाला लावून तपास केला. चव्हाण यांच्या मोबाईलमधून पेटीएमद्दारे केलेल्या २४ रुपयांच्या पेमेंटमुळे या हत्येचे गूढ उकलले. मयत चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले.
चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर पूजाला मदत करणारा मामेभाऊ प्रकाश उर्फ धीरज चव्हाण (२३) आणि प्रविण पान-पाटील (२१) या चौघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा…Panvel News : तळोजातील बेकायदा धाबे, शेड जमीनदोस्त, पनवेल महापालिका, सिडकोची कारवाई
पूजा हिचे भूषण ब्राम्हणे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोमबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रविण याने गळा आवळून हत्या केली. आरोपींनी त्यांचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्स-हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास टाकून अपघात असल्याचा बनावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटारमनच्या सतर्कतेने या हत्येचा कट उघड झाला.
हेही वाचा…Voting Percentage : ती 76 लाख मते आली कुठून; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती
चव्हाण यांच्या हत्या प्रकरणाबाबत रेल्वे पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, त्या दिवशी रात्रीच्या सुमारास विजय चव्हाण यांच्या गुगल पेवरुन
घणसोलीत २४ रुपयांमध्ये भुर्जीपाव घेतल्याची व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे भुर्जीपावच्या गाडीचे ठिकाण गाठले. त्यानंतर पोलिसांनी नजीकच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता, विजय सोबत मामेभाऊ प्रकाश असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता. या गुन्हयाची कबुली दिली.
(Edited by Dnyaneshwar Jadhav)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -