Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम पनवेलमध्ये रिक्षाने लिफ्ट देतो सांगत तरुणीवर अत्याचार; २ आरोपींना अटक

पनवेलमध्ये रिक्षाने लिफ्ट देतो सांगत तरुणीवर अत्याचार; २ आरोपींना अटक

Subscribe

पनवेलमध्ये एका तरुणीवर रिक्षाने लिफ्ट देतो असे सांगत दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पनवेलमध्ये एका तरुणीवर रिक्षाने लिफ्ट देतो असे सांगत दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे रोजंदारी करणारे मजूर आहेत. (panvel two youths arrested for raping 20 years old woman after offering autorickshaw lift)

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली परिसरातून काम संपवल्यानंतर पनवेल इथे आलेल्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. रिक्षातून लिफ्ट देतो, असं सांगत आरोपींनी तिला एका पडीक इमारतीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. अविनाश चव्हाण (22) आणि सूरज देवडे (21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींवर सामूहिक बलात्कार, अपहरण आणि दुखापत करण्याच्या हेतूने मारहाण या आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

पनवेलमध्ये राहणारी तरुणी खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये काम करते. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी तिची शिफ्ट संपवून कामावरुन घरी परतत होती. यानंतर ती पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. जेवण आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी मॉलजवळच ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबली. सामन्यतः या ठिकाणी गर्दी असते. त्यावेळी रिक्षाने आलेल्या दोन जणांनी ‘रस्त्यावर एकटीनं थांबणं सुरक्षित नाही. तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही चला आम्ही काही अंतरावरच रिक्षा पार्क केली आहे’, असं सांगितले. त्यानंतर घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा न मिळाल्याने ही तरुणी त्यांच्यासोबत गेली. ते मुख्य रस्त्यापासून थोडे अंतर चालत गेल्यावर मॉलच्या मागे एका निर्जन भागात असताना त्यांनी तिला धमकावलं.

- Advertisement -

त्यानंतर तिला बळजबरीने रस्त्यापासून दूर नेलं. रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनपासून थोडं दूर असलेल्या एका पडक्या इमारतीत नेलं. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या डोक्यावर वार करुन जखमी केलं. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून पळ काढला. याबाबत पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांनी माहिती दिली.

या घटनेनंतर पीडित तरुणीने पनवेल पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन दोघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पनवेल स्थानकाजवळील झोपडपट्टीतून अटक केली. बलात्कार पीडित तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


हेही वाचा – ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालाचा अदानी ग्रुपला मोठा फटका; श्रीमंत टॉप-10च्या यादीतून बाहेर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -