Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संतापजनक! पपई खाल्ली म्हणून विक्रेत्यांनी गायीवर केला चाकूने हल्ला

संतापजनक! पपई खाल्ली म्हणून विक्रेत्यांनी गायीवर केला चाकूने हल्ला

पपई खाणाऱ्या गायीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे.

Related Story

- Advertisement -

भुकेलेल्या गर्भवती हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खायला दिल्याची अमानुष घटना काही दिवसांपूर्वी केरळमध्ये घटली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशाच संतापाची लाट उसळली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका गायीने पपई खाल्ल्यामुळे तिच्यावर चाकून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यात घडली असून याप्रकरणी आरोपी फळविक्रेत्याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात तौफिक बशीर मुजावर याचा फळविक्रेत्याचा व्यवसाय आहे. या फळविक्रेता फळांची विक्री करत असताना त्याठिकाणी गाय आली. त्या गायीने तौफिक याच्या फळांच्या टोपलीमधील पपई खाल्ली. हे पाहून तौफिक याला प्रचंड चिड आली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता रागाच्या भरात गायीच्या पोटात बाजूला असलेला सुरा खुपसला. हा विक्रेता एवढ्यावरच शांत बसला नाही, तर त्यांनी त्या गायीच्या पायावर देखील चाकूने वार केले. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गायीला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले आणि आरोपी तौफिक बशीर मुजावर याला अटक करण्यात आली. सध्या गायीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या विमानतळावरुन ९ कोटीचे हेरॉईन जप्त; आफ्रिकन महिलेला अटक


 

- Advertisement -